शरीराच्या अंतर्भागाची शुद्धी करण्यासाठी जे उपाय केले जातात, त्यांना शुद्धिक्रिया असे म्हणतात. शुद्धिक्रियांना हठयोगामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. घेरण्डसंहितेमध्ये धौती, बस्ती, नेती, लौलिकी (नौली), त्राटक आणि कपालभाती हे शुद्धिक्रियांचे सहा प्रकार दिले आहेत (धौतिर्बस्तिस्तथा नेति लौलिकी त्राटकंतथा | कपालभातिश्चैतानि षट्कर्माणिसमाचरेत् ||, घेरण्डसंहिता १.१२).