आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिरपूर शहरात भव्यदिव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन
- Posted by Yog Dham Shirpur
- Categories Regular Events
- Date 20/06/2025
योग विद्या धाम संस्था शिरपूर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 20 जून 2025 रोजी संपूर्ण शिरपूर शहरात भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले..
बस स्टँड पासून सुरुवात होऊन गुजराती कॉम्प्लेक्स- पाच कंदील -बालाजी मंदिर- उपजिल्हा रुग्णालय- आशीर्वाद हॉस्पिटल -करवंद नाका- गजानन कॉलनी – बालाजी नगर- वासुदेव बाबा नगर – किरण सोसायटी -निमझरी नाका ते योग विद्या धामपर्यंत अनेक योगशिक्षक,योगसाधक तसेच संपूर्ण शिरपूर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला.
त्यानंतर योग विद्या धाम शिरपूर या ठिकाणी सर्वजण एकत्र जमले आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून मोफत योग वर्ग ज्यांनी घेतले त्या सर्व योग शिक्षकांचा यथोचित गौरव करण्यात आला.डॉ श्रीकांत वाडीले सरांनी 21 जून या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने सर्वांनी दररोज नियमितपणे योग साधना करावी असे आवाहन केले.आणि शेवटी चहापणाने कार्यक्रमाची सांगता झाली
Tag:Yoga Day 2025
You may also like
योग विद्या धाम शिरपूर संस्थेतर्फे डॉ श्रीकांत वाडीले गुरुजी आणि डॉ वर्षाताई वाडीले मॅडम यांच्या पुढाकाराने शिरपूर मधील सर्व योगशिक्षक, योगसाधक तसेच नागरिकांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीच्या दर्शनासाठी पायी दिंडीमध्ये हिरीरीने सहभाग घेतला. सकाळी ठिक 6 सहा वाजता योगशिक्षक …
Admissions 2025-26
अधिकृत योग शिक्षक होण्याची सुवर्ण संधी- कै.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मान्यता प्राप्त ‘ योग शिक्षक ‘( Yog Teacher) या पदविका ( कालावधी 1 वर्ष ) अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु, 10 सप्टेंबर पर्यंत जगभरात योग विद्येचा झपाट्याने प्रसार होत असून …
Role Of Yoga In PCOD
The recent lecture delivered at R C Patel IMRD College regarding the role of yoga in managing PCOD for girls. The information presented was enlightening and provided a comprehensive understanding of how yoga can positively impact the physical and mental …



