दिवाळी पहाट
- Posted by Yog Dham Shirpur
- Categories Regular Events
- Date 29/10/2024
*🪔दिपावली शुभचिंतन 🪔*
*योग विद्या धाम शिरपूर*
तर्फे
शिरपूर च्या इतिहासातील प्रथमच…..
*दीपावलीनिमित्त*
भव्य *पाडवा पहाट संगिता मैफिल कार्यक्रम.*
🎼🎹🎻🎼🎹🎻🎼🎹
जेष्ठ शास्त्रीय गायक पं.अजय पोहनकर यांच्या शिष्य परंपरेतील, आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक
*प्रा.डॉ निरजजी लांडे सर (अकोला)* यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम.
*दि.2 नोव्हेंबर 2024*
*(शनीवार )*
वेळ– *सकाळची प्रसन्न व आनंददायी…..ठिक –६ वा*.
*स्थळ -*
*श्री राजगोपालजी चंदूलाल भंडारी हॉल,*
*आर सी पटेल मेन बिल्डिंग, शिरपूर*
*घेई छंद मकरंद….*
शिरपूरच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण…
दिग्गज कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची व ऐकण्याची माझीही पहिलीच वेळ…
एरवी कार्यक्रमात ऐकलेली सर्व गीते आपण पूर्वीही ऐकलेलीच आहेत पण प्रत्यक्ष आणि आभासी यातला फरक काल कळला…
पं. अजयजी पोहनकरांचे शिष्य म्हटल्यावर *अलबेला साजन आयो री..* नक्कीच होणार हे मनात होतं पण कार्यक्रमाच्या प्रारंभीच झाल्यामुळे सुरवातीलाच ब्रह्मानंदी लीन झालो…
घेई छंद.., बाजे रे मुरलिया.., कानडा राजा पंढरीचा…सूर निरागस…ऐकताना भान हरपणे काय असतं हे कळून आलं.. हे सगळं सुरु असताना लक्ष वेधलं ते तबला वादकाने (पवन सिडाम)…तबल्यावर थिरकणारी त्याची बोटं पाहतच राहिलो.. निरजजींच्या भारदस्त सूरांना पेलण्याची ताकद त्याच्या बोटांमध्ये नक्कीच होती..
लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींच जमत नाही असं ऐकलंय पण लक्ष्मीच्या उत्सवात सरस्वतीच्या पूजकांमार्फत दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा *योग* फक्त योग विद्या धामच आणू शकते हे सांगण्याची गरजच उरली नाही…
उत्कृष्ट नियोजन.. उत्कृष्ट अंमलबजावणी… साधकांचे तन मन धनापासून समर्पण… उत्कृष्ट सूत्रसंचालन.. सारंच काही उत्कृष्ट…
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
You may also like
योग विद्या धाम शिरपूर संस्थेतर्फे डॉ श्रीकांत वाडीले गुरुजी आणि डॉ वर्षाताई वाडीले मॅडम यांच्या पुढाकाराने शिरपूर मधील सर्व योगशिक्षक, योगसाधक तसेच नागरिकांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीच्या दर्शनासाठी पायी दिंडीमध्ये हिरीरीने सहभाग घेतला. सकाळी ठिक 6 सहा वाजता योगशिक्षक …
योग विद्या धाम संस्था शिरपूर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 20 जून 2025 रोजी संपूर्ण शिरपूर शहरात भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.. बस स्टँड पासून सुरुवात होऊन गुजराती कॉम्प्लेक्स- पाच कंदील -बालाजी मंदिर- उपजिल्हा रुग्णालय- आशीर्वाद हॉस्पिटल -करवंद …
Admissions 2025-26
अधिकृत योग शिक्षक होण्याची सुवर्ण संधी- कै.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मान्यता प्राप्त ‘ योग शिक्षक ‘( Yog Teacher) या पदविका ( कालावधी 1 वर्ष ) अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु, 10 सप्टेंबर पर्यंत जगभरात योग विद्येचा झपाट्याने प्रसार होत असून …























