निसर्ग योग साधना 2024
- Posted by Yog Dham Shirpur
- Categories Regular Events
- Date 07/10/2024
आजची सकाळ एक खरोखरच वेगळी सकाळ होती … बरोबर वेळेवर योग विद्या धाम येथून नागेश्वर मंदिराकडे प्रस्थान… तिथे पोहोचल्या बरोबर एक तासभर योगाभ्यास….
आजचा योगाभ्यास एक वेगळीच अनुभूती देणारा होता… नागेश्वर मंदिरासारखे आध्यात्मिक ठिकाण…निसर्गरम्य परिसर…..
वटवृक्षांनी बहरलेल्या ठिकाणी योगाभ्यास..
आणि वर्ग घेणारे आपले गुरुजी. ..
एक दुग्धशर्करा योग …
उगवत्या सूर्याच्या साक्षीने गुरुजींनी घेतलेले सूर्यनमस्कार एक वेगळीच ऊर्जा देऊन गेले …..
त्यानंतर झालेले मानसिक पातळीवरील आसन, प्राणायाम व अंतर्मनाचे ध्यानाने आंतरिक ऊर्जा लाभण्याची अनुभूती आली …..
संपूर्ण योगाभ्यासादरम्यान अंगाला स्पर्श करणारा थंडगार वारा…..पानांची सळसळ ……
पक्षांचा चिवचिवाट व अशा वातावरणात सुंदर असे आत्मषटक……
त्यानंतर चहापान…नागेश्वर भगवंताचे दर्शन मंदिराच्या गाभाऱ्यातील सामूहिक ओंकार उच्चारण ….
मंदिराच्या विश्वस्तांनी केलेला आदर सत्कार …..
हे सारे काही मन भारावून टाकणारे होते आणि हे सर्व काही जे प्राप्त झाले ते आदरणीय गुरुजींमुळेच.. आदरणीय गुरुजींच्या काटेकोर नियोजनामुळे आपली आजची सकाळ संस्मरणीय अशी सकाळ ठरली व पुनश्च एकदा कायमस्वरूपी मनात कोरून राहणारी आपले सर्व योगशिक्षकमित्रांसोबतची निसर्गरम्य ठिकाणची आणखी एक सहल यशस्वी झाली.
धन्यवाद गुरुजी🙏💐
You may also like
योग विद्या धाम शिरपूर संस्थेतर्फे डॉ श्रीकांत वाडीले गुरुजी आणि डॉ वर्षाताई वाडीले मॅडम यांच्या पुढाकाराने शिरपूर मधील सर्व योगशिक्षक, योगसाधक तसेच नागरिकांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीच्या दर्शनासाठी पायी दिंडीमध्ये हिरीरीने सहभाग घेतला. सकाळी ठिक 6 सहा वाजता योगशिक्षक …
योग विद्या धाम संस्था शिरपूर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 20 जून 2025 रोजी संपूर्ण शिरपूर शहरात भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.. बस स्टँड पासून सुरुवात होऊन गुजराती कॉम्प्लेक्स- पाच कंदील -बालाजी मंदिर- उपजिल्हा रुग्णालय- आशीर्वाद हॉस्पिटल -करवंद …
Admissions 2025-26
अधिकृत योग शिक्षक होण्याची सुवर्ण संधी- कै.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मान्यता प्राप्त ‘ योग शिक्षक ‘( Yog Teacher) या पदविका ( कालावधी 1 वर्ष ) अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु, 10 सप्टेंबर पर्यंत जगभरात योग विद्येचा झपाट्याने प्रसार होत असून …






